हिम्मत लागते...

हिम्मत लागते...

मित्रा,

मरणं खूप सोप्पं आहे; कठिण परिस्थितीत जगायला हिम्मत लागते.


(1) आईवडीलांच्या जीवावर उड्या मारणं सोप्पं आहे. त्यांनी आपल्या जीवावर उड्या माराव्या असं काहीतरी करायला हिम्मत लागते.

(2) अभ्यास करून मोठं व्हायच्या वेळी नको त्या फंदात पडणं खूप सोप्पं आहे. अन् अशावेळी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्वतःच भविष्य घडवायला सुद्धा हिम्मत लागते.

(3) आई कधी कधी रागावते, चिडते... अशावेळी तिच्यावर न रागावता तिच्या कष्टांची, तिच्याबद्दलच्या कर्तव्यांची जाण ठेवत तिला एक हलकीच Smile द्यायला सुद्धा हिम्मत लागते.

(4) शाळा, कॉलेज, क्लासेस मधल्या शिक्षकांची टिंगलटवाळी तर सगळेच करतात. त्यांना मनोमन प्रामाणिकपणे Respect द्यायला सुद्धा हिम्मत लागते.

(5) कधी कधी आपल्या मैत्रिणीवरच आपलं प्रेम जडतं… अशावेळी आपण तिला विचारलं तर आपली मैत्री तर तुटणार नाही ना? या आदरयुक्त भीतीने शांत राहायला सुद्धा हिम्मत लागते.

(6) झालच तर प्रेम करण सोप्पं आहे. प्रेम निभवायला हिम्मत लागते.

(7) लग्न केल्यावर बायकोवर हक्क गाजवणं खूप सोप्पं आहे. याउलट तिला तिचं स्वातंत्र्य द्यायला हिम्मत लागते.

(8) महिन्याच्या सुरुवातीला पगार मागणारे बरेच जण असतात, हिम्मत लागते ती पगार देणारा बनायला.

(9) 10-6 office ची नोकरी करणं खूप सोप्पं आहे मित्रा. हिम्मत लागते ती स्वतःच व्यवसायरुपी साम्राज्य निर्माण करायला...

(10) मळलेल्या वाटा सगळेच तुडवतात… अशावेळेस कधी कधी समाजाला अनपेक्षित अशा वाटेने जायला सुद्धा हिम्मत लागते.

(11) आपण समाजशील प्राणी, समाजाचे काहीतरी देणं लागतो. आपण वयाने, शरीराने, जबाबदारीने सतत मोठे होत असतो. अशावेळेस या दगदगीतसुद्धा मनाने आपल्यातील बालपण जीवंत ठेवायला सुद्धा हिम्मत लागते.

(12) आयुष्यात कुणीतरी आपल्याशी जाणूनबुजून चुकीचा वागतो. त्याच वागणं हा त्याचा दोष. मी चांगला आहे, मी चांगलच वागेन, असे ठरवून चांगलं वागायला सुद्धा हिम्मत लागते.

(13) जगाच्या प्रवाहासोबत जगणं खूप सोप्पं आहे. प्रवाहाविरोधात जगायला, वागायला सुद्धा खूप हिम्मत लागते. 

(14) WhatsApp, facebook, Insta, वर तासन्-तास virtual जगाशी connect होणे खूप सोप्पं आहे. अशावेळी कुठेतरी शांत बसून, एकाग्र होवून स्वतःशी connect व्हायला सुद्धा हिम्मत लागते. म्हणजेच, जगाच्या कचाट्यात, गोंधळात स्वतःचा आतला आवाज ऐकायला सुद्धा हिम्मत लागते.

(15) सरकारी नियम धाब्यावर बसवणं, Traffic signals तोडणं खूप सोप्पं आहे. कुणीही आपल्याकडे पाहणार नाही, दंड लावणार नाही हे माहीत असताना सुद्धा नियम अन् signal पाळायला सुद्धा हिम्मत लागते.

(16) मनातल्या मनात गोष्टी साठवणं खूप सोप्पं आहे मित्रा… मनातल्या गोष्टी व्यक्त करायला, कागदावर उतरवायला सुद्धा हिम्मत लागते.

कविता आपण सगळेच जण रचतो... काहीजण मनातल्या मनात ठेवतात, हिम्मत लागते ती कविता कागदावर उतरवायला, व्यक्त करायला...

चला व्यक्त होवूया... चला लिहिते बनूया...

मुक्तछंद कविता...

कविता न संपणारी... सदर कविता आपणही extend करू शकता...

-सागर पुंडलिक इप्ते, वरळी.
(92242 41184)

Comments

Popular posts from this blog

इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ – शिक्षकाच्या नजरेतून