Posts

Showing posts from August, 2023

Let's try me...

Image
मंडळी, आपल्या आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठीच.  प्रॉब्लेम पण येतात ना ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात. आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी येत असतात.    जर देव आपल्यासमोर एखादा प्रॉब्लेम सादर करत असेल तर त्याला Thank you म्हटलं पाहिजे. "Why me?", "मीच का?",   "माझ्याच बाबतीत असं का?" असं न म्हणता "Let's Try me..." म्हटलं पाहिजे. आपल्या आयुष्यात प्रत्येक समस्या ही आपल्याला काही ना काही शिकवण देण्यासाठी येत असते. गरज आहे आपण त्या समस्येकडे उघड्या डोळ्यांनी सकारात्मक अशा दृष्टिकोनातून बघण्याची... कोणत्याही गोष्टीचा, घटनेचा परिणाम हा त्या ठराविक घटनेला, परिस्थितीला दिलेल्या Response वर ठरत असतो... Response सकारात्मक असेल तर परिणाम सुद्धा चांगलाच मिळतो... Response नकारात्मक असेल तर परिणाम सुद्धा वाईट मिळतो... बाप दारू पिऊन घरी धिंगाणा घालायचा, या परिस्थितीला Response म्हणून दोन मुले भविष्यात वेगवेगळ्या प्रकारे तयार झाली. एक त्यांच्याच सारखाच अट्टल बेवडा झाला तर दुसऱ्याने दारूला कधी हातच लावायचं नाही असं मनोमन ठरवलं...  "दारू...

सोडून द्या...

Image
उंच उडायचं असेल तर बऱ्याच गोष्टी धरून ठेवण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी सोडून देणे फायदेशीर ठरत असतं. रीत (रिकामं) होणं गरजेचं असतं. हलकं होणं गरजेचं असतं. ओझं टाकून देणे फायदेशीर ठरत असतं.  मग ते ओझं कसलंही असो... नकारात्मक विचारांच असो... अशक्यतांचं असो... असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टींचं असो... आपल्याला मागे खेचणाऱ्या विचारांचं अथवा विचारधारेचं असो...  त्रास होण्यापूर्वीच बऱ्याच गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. बऱ्याचदा शारीरिक कष्टांपेक्षा मनुष्य मानसिक विचारांनीच (कष्टांनीच) अधिक थकून जात असतो.  आणि म्हणूनच सोडून दिलं पाहिजे... आपल्या मनाला कमकुवत करणाऱ्या गोष्टींना, विचारांना तिलांजली ही दिलीच पाहिजे... सागर पुंडलिक इप्ते, वरळी. शिल्पकार क्लासेस  (92242 41184)