Let's try me...

मंडळी,

आपल्या आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठीच. 

प्रॉब्लेम पण येतात ना ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात. आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी येत असतात.
  
जर देव आपल्यासमोर एखादा प्रॉब्लेम सादर करत असेल तर त्याला Thank you म्हटलं पाहिजे. "Why me?", "मीच का?",   "माझ्याच बाबतीत असं का?" असं न म्हणता "Let's Try me..." म्हटलं पाहिजे.

आपल्या आयुष्यात प्रत्येक समस्या ही आपल्याला काही ना काही शिकवण देण्यासाठी येत असते. गरज आहे आपण त्या समस्येकडे उघड्या डोळ्यांनी सकारात्मक अशा दृष्टिकोनातून बघण्याची...

कोणत्याही गोष्टीचा, घटनेचा परिणाम हा त्या ठराविक घटनेला, परिस्थितीला दिलेल्या Response वर ठरत असतो...

Response सकारात्मक असेल तर परिणाम सुद्धा चांगलाच मिळतो... Response नकारात्मक असेल तर परिणाम सुद्धा वाईट मिळतो...

बाप दारू पिऊन घरी धिंगाणा घालायचा, या परिस्थितीला Response म्हणून दोन मुले भविष्यात वेगवेगळ्या प्रकारे तयार झाली. एक त्यांच्याच सारखाच अट्टल बेवडा झाला तर दुसऱ्याने दारूला कधी हातच लावायचं नाही असं मनोमन ठरवलं... 

"दारूचे परिणाम मी भोगले आहेत... मला माहिती आहेत... त्यामुळे मी दारूला कधी स्पर्शच करणार नाही, हातच लावणार नाही." असं ठरवून आयुष्याचं सोनं केलं...

मित्रांनो, परिस्थिती एकच होती पण, दोघा भावंडांची त्या परिस्थितीला दिलेली Responses वेगवेगळी होती. त्यामुळे दोघांनाही वेगवेगळा परिणाम मिळाला.

मित्रांनो, 
आपल्याला जन्म एकदाच मिळालाय त्याचं सोनं करूया. परिस्थिती कितीही बिकट असू दे, आपण मात्र ताकदीने लढायचं. Problems ना हसत हसत सामोरे जायचं. प्रत्येक गोष्टीतून, घटनेतून, Even नकारात्मक परिस्थितीतून सुद्धा आपल्याला काय सकारात्मक काढता येईल, शोधता येईल याचा विचार करायचा... 

धन्यवाद !!!
सागर पुंडलिक इप्ते ( संचालक, शिल्पकार क्लासेस, वरळी.)
MSc BEd.
92242 41184

Comments

Popular posts from this blog

इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ – शिक्षकाच्या नजरेतून

हिम्मत लागते...