Posts

Showing posts from August, 2022

कधीतरी थांबावं... #STOP

Image
कधीतरी थांबावं. सततची गतिमानता प्रत्येकवेळी पोषक असेलच असे नाही. Engine ला आराम मिळावा, श्वासातलं अंतर कळावं, याकरता STOP महत्वाचं आहे. पुढच्या मोठ्या मोहिमेच्या तयारी करता, Energy production करीता देखील stop महत्वाचं.  आयुष्याचा न कळलेला अर्थ कळण्यासाठी... आतापर्यंत न सापडलेल्या गोष्टी शोधण्यासाठी सुद्धा STOP गरजेचा... पण हा STOP काही सेकंदापुरता ठीक आहे... म्हणजेच simply required pause. असिमिता पल्याडचं विश्व संकुचित न बनता आश्वासक कसं बनवता येईल याचा विचार करण्यासाठी सुद्धा pause महत्त्वाचा... सागर पुंडलिक इप्ते, वरळी. शिल्पकार क्लासेस  (92242 41184)

हिम्मत लागते...

Image
हिम्मत लागते... मित्रा, मरणं खूप सोप्पं आहे; कठिण परिस्थितीत जगायला हिम्मत लागते. (1) आईवडीलांच्या जीवावर उड्या मारणं सोप्पं आहे. त्यांनी आपल्या जीवावर उड्या माराव्या असं काहीतरी करायला हिम्मत लागते. (2) अभ्यास करून मोठं व्हायच्या वेळी नको त्या फंदात पडणं खूप सोप्पं आहे. अन् अशावेळी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्वतःच भविष्य घडवायला सुद्धा हिम्मत लागते. (3) आई कधी कधी रागावते, चिडते... अशावेळी तिच्यावर न रागावता तिच्या कष्टांची, तिच्याबद्दलच्या कर्तव्यांची जाण ठेवत तिला एक हलकीच Smile द्यायला सुद्धा हिम्मत लागते. (4) शाळा, कॉलेज, क्लासेस मधल्या शिक्षकांची टिंगलटवाळी तर सगळेच करतात. त्यांना मनोमन प्रामाणिकपणे Respect द्यायला सुद्धा हिम्मत लागते. (5) कधी कधी आपल्या मैत्रिणीवरच आपलं प्रेम जडतं… अशावेळी आपण तिला विचारलं तर आपली मैत्री तर तुटणार नाही ना? या आदरयुक्त भीतीने शांत राहायला सुद्धा हिम्मत लागते. (6) झालच तर प्रेम करण सोप्पं आहे. प्रेम निभवायला हिम्मत लागते. (7) लग्न केल्यावर बायकोवर हक्क गाजवणं खूप सोप्पं आहे. याउलट तिला तिचं स्वातंत्र्य द्यायला हिम्मत लागते. (8...