Posts

Showing posts from March, 2026

संजू सॅमसन...वर्ल्ड कप 2026, मॅच विनिंग खेळी Insights...

Image
1. कमबॅक असावा तर असा... 2. टिकून राहणे महत्वाचे... दिवस येतील. दिवस येतात. 3. आत्मविश्वास (स्वतःवरचा विश्वास ) महत्वाचा. 4. Face करणं महत्त्वाचं. 5. कामावरचा फोकस महत्त्वाचा. मन लावून काम करणे महत्वाचे. 6. या जगात फक्त आणि फक्त चमत्काराला नमस्कार असतो. 7. मिळालेल्या संधीचं सोनं करा. 8. जबाबदारी घ्या. यश खेचून आणा. 9. Average Important. कधी रन्स बनतील, कधी नाही. 10. महत्वाचं Skill. Pressure handle करता येणं. 11. कधी कधी वेळेलाही वेळ द्यावा लागतो. 12. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिल्यास नशीब सुद्धा साथ देतं. 13. Game End पर्यंत न्या. 14. शेवटपर्यंत लढणं महत्त्वाचं. 15. Over Confidence नकोच. 16. जिंकण्याआधीच Celebration नको. 17. Game Awareness महत्वाचं. 18. Game कधीही बदलू शकतो.  19. प्रत्येकाचा दिवस येतो. #संजू 20. It's God's plan संजू. सागर पुंडलिक इप्ते, वरळी. शिल्पकार क्लासेस  (92242 41184)

इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ – शिक्षकाच्या नजरेतून

Image
इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ – शिक्षकाच्या नजरेतून इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ हा प्रत्येक शिक्षकासाठी भावनांनी भरलेला क्षण असतो. वर्षानुवर्षे ज्या विद्यार्थ्यांना आपण घडवत असतो, त्यांना निरोप देण्याची वेळ आली की, मनात आनंद, अभिमान आणि थोडीशी हुरहूर अशा मिश्र भावना दाटून येतात. शिक्षकाच्या दृष्टीने हे विद्यार्थी फक्त ‘विद्यार्थी’ नसतात, तर ते आपल्या कुटुंबाचा एक भाग बनलेले असतात. त्यांच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. कधी खोडकर, कधी अभ्यासात रममाण, तर कधी निराश झालेल्या या मुलांना योग्य मार्गदर्शन देताना शिक्षकांचाही प्रवास समृद्ध होत जातो. निरोप समारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. नवीन कपडे, नवीन चष्मा,... मस्त टकाटक तयार. काहीजण उत्साहात असतात, तर काहींच्या डोळ्यांत अश्रू दाटलेले असतात. शिक्षक म्हणून त्या प्रत्येक भावनेशी आपण जोडलेले असतो. त्यांच्या यशात आपला वाटा असल्याचा अभिमान वाटतो, पण त्यांच्याशिवाय वर्ग रिकामा वाटेल ही जाणीवही मनाला स्पर्श करून जाते. या प्रसंगी एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना काही मोलाचे...