सोडून द्या...
उंच उडायचं असेल तर बऱ्याच गोष्टी धरून ठेवण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी सोडून देणे फायदेशीर ठरत असतं. रीत (रिकामं) होणं गरजेचं असतं. हलकं होणं गरजेचं असतं. ओझं टाकून देणे फायदेशीर ठरत असतं.
मग ते ओझं कसलंही असो... नकारात्मक विचारांच असो... अशक्यतांचं असो... असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टींचं असो... आपल्याला मागे खेचणाऱ्या विचारांचं अथवा विचारधारेचं असो...
त्रास होण्यापूर्वीच बऱ्याच गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. बऱ्याचदा शारीरिक कष्टांपेक्षा मनुष्य मानसिक विचारांनीच (कष्टांनीच) अधिक थकून जात असतो.
आणि म्हणूनच सोडून दिलं पाहिजे... आपल्या मनाला कमकुवत करणाऱ्या गोष्टींना, विचारांना तिलांजली ही दिलीच पाहिजे...
सागर पुंडलिक इप्ते, वरळी.
शिल्पकार क्लासेस
(92242 41184)
Comments
Post a Comment