Posts

Let's try me...

Image
मंडळी, आपल्या आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठीच.  प्रॉब्लेम पण येतात ना ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात. आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी येत असतात.    जर देव आपल्यासमोर एखादा प्रॉब्लेम सादर करत असेल तर त्याला Thank you म्हटलं पाहिजे. "Why me?", "मीच का?",   "माझ्याच बाबतीत असं का?" असं न म्हणता "Let's Try me..." म्हटलं पाहिजे. आपल्या आयुष्यात प्रत्येक समस्या ही आपल्याला काही ना काही शिकवण देण्यासाठी येत असते. गरज आहे आपण त्या समस्येकडे उघड्या डोळ्यांनी सकारात्मक अशा दृष्टिकोनातून बघण्याची... कोणत्याही गोष्टीचा, घटनेचा परिणाम हा त्या ठराविक घटनेला, परिस्थितीला दिलेल्या Response वर ठरत असतो... Response सकारात्मक असेल तर परिणाम सुद्धा चांगलाच मिळतो... Response नकारात्मक असेल तर परिणाम सुद्धा वाईट मिळतो... बाप दारू पिऊन घरी धिंगाणा घालायचा, या परिस्थितीला Response म्हणून दोन मुले भविष्यात वेगवेगळ्या प्रकारे तयार झाली. एक त्यांच्याच सारखाच अट्टल बेवडा झाला तर दुसऱ्याने दारूला कधी हातच लावायचं नाही असं मनोमन ठरवलं...  "दारू...

सोडून द्या...

Image
उंच उडायचं असेल तर बऱ्याच गोष्टी धरून ठेवण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी सोडून देणे फायदेशीर ठरत असतं. रीत (रिकामं) होणं गरजेचं असतं. हलकं होणं गरजेचं असतं. ओझं टाकून देणे फायदेशीर ठरत असतं.  मग ते ओझं कसलंही असो... नकारात्मक विचारांच असो... अशक्यतांचं असो... असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टींचं असो... आपल्याला मागे खेचणाऱ्या विचारांचं अथवा विचारधारेचं असो...  त्रास होण्यापूर्वीच बऱ्याच गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. बऱ्याचदा शारीरिक कष्टांपेक्षा मनुष्य मानसिक विचारांनीच (कष्टांनीच) अधिक थकून जात असतो.  आणि म्हणूनच सोडून दिलं पाहिजे... आपल्या मनाला कमकुवत करणाऱ्या गोष्टींना, विचारांना तिलांजली ही दिलीच पाहिजे...

कधीतरी थांबावं... #STOP

Image
कधीतरी थांबावं. सततची गतिमानता प्रत्येकवेळी पोषक असेलच असे नाही. Engine ला आराम मिळावा, श्वासातलं अंतर कळावं, याकरता STOP महत्वाचं आहे. पुढच्या मोठ्या मोहिमेच्या तयारी करता, Energy production करीता देखील stop महत्वाचं.  आयुष्याचा न कळलेला अर्थ कळण्यासाठी... आतापर्यंत न सापडलेल्या गोष्टी शोधण्यासाठी सुद्धा STOP गरजेचा... पण हा STOP काही सेकंदापुरता ठीक आहे... म्हणजेच simply required pause. असिमिता पल्याडचं विश्व संकुचित न बनता आश्वासक कसं बनवता येईल याचा विचार करण्यासाठी सुद्धा pause महत्त्वाचा...

हिम्मत लागते...

Image
हिम्मत लागते... मित्रा, मरणं खूप सोप्पं आहे; कठिण परिस्थितीत जगायला हिम्मत लागते. (1) आईवडीलांच्या जीवावर उड्या मारणं सोप्पं आहे. त्यांनी आपल्या जीवावर उड्या माराव्या असं काहीतरी करायला हिम्मत लागते. (2) अभ्यास करून मोठं व्हायच्या वेळी नको त्या फंदात पडणं खूप सोप्पं आहे. अन् अशावेळी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्वतःच भविष्य घडवायला सुद्धा हिम्मत लागते. (3) आई कधी कधी रागावते, चिडते... अशावेळी तिच्यावर न रागावता तिच्या कष्टांची, तिच्याबद्दलच्या कर्तव्यांची जाण ठेवत तिला एक हलकीच Smile द्यायला सुद्धा हिम्मत लागते. (4) शाळा, कॉलेज, क्लासेस मधल्या शिक्षकांची टिंगलटवाळी तर सगळेच करतात. त्यांना मनोमन प्रामाणिकपणे Respect द्यायला सुद्धा हिम्मत लागते. (5) कधी कधी आपल्या मैत्रिणीवरच आपलं प्रेम जडतं… अशावेळी आपण तिला विचारलं तर आपली मैत्री तर तुटणार नाही ना? या आदरयुक्त भीतीने शांत राहायला सुद्धा हिम्मत लागते. (6) झालच तर प्रेम करण सोप्पं आहे. प्रेम निभवायला हिम्मत लागते. (7) लग्न केल्यावर बायकोवर हक्क गाजवणं खूप सोप्पं आहे. याउलट तिला तिचं स्वातंत्र्य द्यायला हिम्मत लागते. (8...